लंडन- दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. जगभरात कोरोनाच्या लसीवर काम चालू असून या वर्षाच्या अखेरिस अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला लस येईल असं चित्र होतं. त्यात रशियाने त्यांची लस तयार झाल्याचे ऑगस्ट महिन्यातच जाहीर केलं होतं. ऑक्सफर्ड (Oxford covid-19 Vaccine) आणि 'अॅस्ट्राझेनेका' (AstraZeneca) यांनी तयार केलेल्या कोरोनावरील लशीला आाता झटका बसला आहे. ही लस तिच्या मानवी चाचणीच्या टप्प्यात होती. 'अॅस्ट्राझेनेका' आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस (Oxford covid-19 Vaccine) च्या मानवी चाचणीत सामील असलेला एक व्यक्ती आजारी पडला आहे. त्यामुळे या लसीची चाचणी थांबवली आहे. 'अॅस्ट्राझेनेका'ने एक निवेदन जारी केले आहे त्यांमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'हे एक नियमित व्यत्यय (Routine interruptions) आहे, चाचणीत सामील झालेला व्यक्तीच्या आजाराबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही.'
या लसीला एझेडडी -1222 (AZD1222)असे नाव देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगातील इतर लसींच्या चाचण्यांच्या तुलनेत ही लस आघाडीवर होती. सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून आहे. एएफपीच्या (AFP) वृत्तानुसार, सध्या सुरू असलेली या लसींच्या चाचणींना जगभर थांबविण्यात आले आहे आणि आता स्वतंत्र तपासणीनंतरच ती पुन्हा सुरू होऊ शकते. या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात हजारो लोक सामील आहेत. कोरोना लसीच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीमध्ये जवळजवळ 30 हजार लोकांचा समावेश आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, अशा मोठ्या चाचणीत व्यक्ती आजारी पडण्याची सर्व शक्यता आहे, तरीसुध्दा आजारी व्यक्तीची स्वतंत्र तपासणी करणे फार महत्वाचे आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठात कोरोना व्हायरस लसीची चाचणी थांबविण्याची ही दुसरी वेळ आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.